बेळगाव येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील खुल्या गटात गोल्डन स्क्वेअरच्या प्रकाश कुलकर्णी याने 9 राउंडमध्ये 8 पॉईंट मिळवीत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. अजय चेस अकॅडमीच्यावतीने येथील युनियन जिमखाना सभागृहात ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजण्यात आली होती.
स्पर्धेत खुल्या गटात पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या गोल्डन अकॅडमीच्या प्रकाश कुलकर्णी त्याच्यामागोमाग 9 राऊंडमध्ये 8 पॉईंट मिळवीत दत्तात्रेय राव यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. तर 9 राऊंड मध्ये 7 पॉईंट मिळवणाऱ्या साहिल यांनी याच ओपन गटात पाचवा क्रमांक मिळवून गोल्डन स्क्वेअरचे नाव लौकिक केले.
इयत्ता पाचवी ते सातवी या गटात इधांत व्ही. एच. याने दुसरा, अनिरुद्ध दासरी याने तिसरा, शिवनागराज ऐहळी याने चौथा, वैष्णवी व्ही. हिने सहावा, आर्या बुरसेने सातवा तर वैभवी भट्ट हिने नववा क्रमांक मिळविला.
इयत्ता आठवी ते दहावी या गटात साईप्रसाद खोकाटे याने दुसरा, समय उपाध्ये याने तिसरा, निश्चल सखदेव याने पाचवा तर साकेत मेळवंकी याने सहावा क्रमांक पटकाविला.
उल्लेखनीय यश मिळवलेल्या गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या या बुद्धिबळपटूंनी याआधीही जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेकदा मजल मारली आहे. या बुद्धिबळपटूंना अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.