Monday, December 23, 2024

/

रोडवर बर्निंग कारचा थरार आणि बघ्यांची गर्दी…

 belgaum

कारचे इंजिन ओवरहीट झाल्याने तापून कारला आग लागल्याची घटना बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवर शुक्रवारी दुपारी घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कार पूर्ण जळून खाक झाली.

याबाबत समजलेल्या अधिक घटनेनुसार मध्यप्रदेश हून बेळगाव ला आलेली ही कार आगीत भस्म झाली सुदैवाने कार चालक देखील गाडी बाहेर होता त्यामुळे जीवित्तहानी झाली नाही मात्र पूर्णपणे कार घटनास्थळी जळून भस्म झाली.Car burnt

रिलायन्स मॉल जवळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.मार्च महिना सुरू झाला असून उन्हाळ्याच्या झळा देखील बसण्यास सुरुवात झाली आहे.

मागील आठवड्यात आझाद नगर येथे गादी कारखान्याला आग लागली होती तर खडे बाजार मधील एक कपड्याचे दुकान देखील आगीत भस्म झाले होते आता आगीची मागील एका आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.