हिंडलगा येथील हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे येत्या शनिवार दि. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंडलगा ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर आणि एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक -चेअरमन संजय सुंठकर पुरस्कृत जिल्हास्तरीय 10 वी हिंडलगा श्री -2022, ग्रामपंचायत स्तरीय 10 वी हिंडलगा क्लासिक -2022 आणि जिम पातळीवरील रुद्र क्लासिक टॉप टेन या शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि सहकार्याने सदर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. हिंडलगा -बॉक्साईट रोड, आंबेवाडी क्रॉस हिंडलगा बेळगाव येथे आयोजित केली जाणारी ही स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 85 किलो वरील वजनी गट अशा सात वजनी गटात घेतली जाणार आहे.
स्पर्धेतील यशस्वी शरीरसौष्ठवपटूंना आकर्षक रोख पारितोषिके आणि करंडक दिले जाणार आहेत. सदर स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी नागेश मडिवाळ (मो.क्र. 9035134605), सुनील राऊत (9620407700) किंवा सचिन किल्लेकर (9611548525) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.