सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात तुंबळ युद्ध सुरू असल्याने या बातम्या ऐकून जगभरात बसलेल्या सगळ्यांच्या अंगावर काटे येत आहेत परंतु या युद्धाच्या पाश्वभूमीवर युद्धभूमीत जीव मुठीत धरून अनेक ठिकाणी आश्रय घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना सहीसलामत बाहेर आणण्याचे काम देखील अनेक जण करत आहेत.त्यापैकी एक एअर इंडियाची पायलट आहे जीचे नाव दिशा मन्नूर आहे.
युक्रेन मध्ये अडकेल्या शेकडो विद्यार्थ्यांना विमानातून सही सलामत आणण्याचे काम धाडसी पायलट दिशा आदित्य मन्नूर यांनी केलं आहे. पायलट दिशा मन्नूर या बेळगावच्या सून आहे ही बाब बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे. एअर इंडियाच्या चार वैमानिका पैकी एक आहेत ज्यांनी मिशन गंगा मध्ये सहभागी आहेत .
मिशन गंगा अंतर्गत युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप स्वदेशी आणायचे काम अनेक विमाने वायू दल आणि भारत सरकारचे मंत्री करत आहेत.
सध्या मुंबई येथील गोरेगाव मध्ये वास्तव्यास असलेल्या मूळच्या बेळगावच्या पद्मजा प्रहलाद मन्नूर यांच्या पायलट ‘दिशा’ या सून आहेत.पद्मजा मन्नूर या गोरेगाव कर्नाटक संघाच्या पदाधिकारी आहेत.त्यांची सून दिशा आणि मुलगा आदित्य हे दोघेही एअर इंडिया मध्ये पायलट आहेत. दिशा यांनी एअर इंडिया मधील ड्रीम लायनर 787 या विमानाच्या वैमानिक आहेत.
सध्या युक्रेन रशिया युद्धात अडकलेल्या 242 जणांना सुरक्षित देशात आणणाऱ्या 4 पायलट पैकी एक त्या आहेत. नुकताच ए आय 1947 या विमानातून युक्रेनच्या कीव हुन नवी दिल्लीत शेकडो भारतीयांना सुखरूप आणल त्याच्या पायलट दिशा होत्या युक्रेन मधून त्या विमानाला भारतात आणण्यात ‘दिशा’ यांचे मोलाचे योगदान आहे.
दिशा यांनी 2011 मध्ये न्यूजिलँड मधील वेलींग्टन मधुन पायलट ट्रेनिंग घेतलं होतं 2017 साली एअर इंडिया मध्ये त्या वैमानिक म्हणून रुजू झाल्या होत्या एअर इंडियाच्या पायलट म्हणून त्यांनी अनेक देशात विमाने उडवली आहेत.युक्रेन युद्ध भूमीतून विद्यार्थ्यांना आणणाऱ्या विमानाचे पायलटिंग केल्याने बेळगावकरांना दिशा यांचा अभिमान आहे.