Thursday, December 26, 2024

/

डी सी बँकेत कत्ती सवदी समर्थकाचा विजय

 belgaum

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात डीसीसी बँकेचा टी ए पी एम एस तालुका ऍग्रो मार्केटिंग सोसायटीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत उमेश कत्ती आणि लक्ष्मण सवदी यांच्या समर्थक असणारे संजू अवकणवर यांनी विजय मिळवलेला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील दहा तालुका मार्केटिंग सोसायटी मधून एक सदस्य डीसीसी बँकवर निवडून जात असतो.विद्यमान सदस्य अशोक अवकनावर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर शनिवारी निवडणूक झाली.

जिल्ह्यातील एकूण 10 पैकी 6 टी ए पी एम एस सदस्यांनी अथणी येथील संजय अवकनावर यांना मतदान केले तर 4 सदस्यांनी रामदुर्ग येथील फतेहसिंह माणिक सिंह जगताप यांना मतदान केलं तर सौन्दत्ती येथील रवींद्र यलीगार यांना शून्य मते पडली.

सदर निवडणुक कत्ती बंधू सवदी विरुद्ध जारकीहोळी बंधू अशी रंगली होती कत्ती यांच्या समर्थकाला टी ए पी एम एस मधून डी सी सी बॅंकेवर जाण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे जारकीहोळी बंधू या निवडणुकीत तरी मागे पडले आहेत.

सवदी कत्ती एकत्र आल्याने आणि जारकीहोळी बंधू दुसऱ्या बाजूला गेल्याने एकूणच या निवडणूक निकालाचे बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर कितपत परिणाम होतात हे पहावे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.