बेळगाव जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून (बीडीसीसी) येत्या 16 मार्च 2022 रोजी रामदुर्ग येथील कर्जबाजारी श्री शिवसागर शुगर्सच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. सदर लिलाव प्रक्रिया कारखान्याच्या आवारातच होणार आहे.
श्री शिवसागर शुगर्स हा गेल्या 5 वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना नुकताच यावर्षी प्रारंभ झाला होता. बीडीसीसी बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यावर बीडीसीसी बँक आणि डीसीसी बँक विजयापुरा यांच्याकडून घेतलेल्या 102.47 कोटी रुपये इतक्या कर्जाचा बोजा आहे.
या दोन्ही बँकांनी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाला नोटीस पाठवून देखील त्यांच्याकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी बँकांना कारखाना मालमत्तेचा लिलाव प्रक्रियेचा अवलंब करावा लागत आहे.
श्री शिवसागर शुगर्स रामदुर्गच्या आवारात येत्या 16 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता लिलाव प्रक्रिया होणार आहे.