बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेची १७२ वी वार्षिक सर्वसधारण सभा रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५-०० वाजता वाचनालयाच्या मोफत वाचन सभागृहात खेळीमेळीत संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता मोहिते या होत्या. सदर सभेस ८० हून अधिक सभासद उपस्थित होते.
प्रारंभी सौ. मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गेल्या दोन वर्षात कोविड १९ मुळे वाचनालयाचे विविध कार्यक्रम होऊ शकले नाहीत. मात्र, आता कोविड संपुष्टात आला असल्याने यापुढे सर्वच कार्यक्रम पूर्ववत साजरे केले जातील, असे जाहीर केले.
संस्थेचे मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन केले आणि त्या विषय पत्रिकेनुसार सभासदांनी सभेचे ठराव सर्वानुमते मंजूर केले.
उपस्थित सभासदांनी मागील वर्षात संस्थेच्या कार्यकारी मंडळाने केलेल्या कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले. शेवटी संस्थेचे मानद सहकार्यवाह अॅड. आय. जी. मुचंडी यांनी आभार मानले व यानंतर सभेचे सांगता झाली.