लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) आज भल्या पहाटे बेंगलोरसह राज्यात विविध 78 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या.
राज्यातील बेनामी संपत्ती बाळगण्याचा आरोप असलेल्या 18 सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयासह एकूण 78 ठिकाणी एसीबीच्या 200हून अधिक अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाडसत्र हाती घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या या राज्यव्यापी धाडसत्रा अंतर्गत गोकाक तालुक्यातील कौजलगी विभागाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता बसवराज शेखर रेड्डी पाटील यांच्यावरही धाड टाकण्यात आली आहे.
बसवराज पाटील यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर धाड टाकणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सध्या चौकशीसह कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.