Saturday, January 25, 2025

/

आसाम मेघालय सीमावाद मिटला… कर्नाटक महाराष्ट्र कधी?

 belgaum

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला मेघालय आणि आसाम या दोन राज्यातील सीमावाद मिटवला आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी उभय या वादात यशस्वी यशस्वी मध्यस्थी केली असून आसाम आणि मेघाला दरम्यान ऐतिहासिक करार झाला आहे.दिल्लीमध्ये गृहमंत्रालयात दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत या सीमा प्रश्नावर तोडगा काढून हा वाद मिटविण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम आणि मेघालयाचा वाद ऐतिहासिक करार करून मिटवला त्याच पद्धतीने गेल्या 66 वर्षांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये प्रलंबित असलेला बेळगावचा सीमाप्रश्न का सोडवू नये ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून गृहमंत्र्यांनी बेळगाव वादाकडेही लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी वाढू लागली आहे.

बेळगावातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेल्या 66 वर्षांपासून लोकशाही मार्गातून आंदोलन करत आहेत त्या पद्धतीने कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा प्रश्न शाह यांनी मध्यस्थी करून सोडवावा अशी देखील मागणी यानिमित्ताने वाढू लागली आहे

 belgaum

मंगळवारी आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक करार झाला आहे दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या कराराला सहमती दर्शविली आहे आसामचे मुख्यमंत्री हीमंता बिस्वा सरमा, खासदार दिलीप सिकिया आणि मेघालाय चे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष सीमावाद सोडवण्यासाठी करार केला आहेAmit shah

अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या कराराला सहमती दर्शविली आहे या दोन राज्यांच्या सीमा वादांमध्ये 12 पैकी सहा मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे ज्यात सीमेच्या जवळपास 70 टक्के भागांचा समावेश आहे उर्वरित सहा मुद्दे लवकरात लवकर सोडविल्या जातील अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी दिली आहे. दोन्ही राज्यांमधील 70 टक्के आज सीमावाद मिटला आहे.पुढील वाद लवकरच सोडवू असे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे त्यामुळे या ईशान्येकडील सिमा वादावर आज पडदा पडला आहे

आसाम आणि मेघालय सरकारने 884 किलोमीटर सीमा असलेल्या 12 पैकी सहा आंतर प्रदेशी क्षेत्रांमधील सीमावाद सोडवण्यासाठी मसुदा प्रस्ताव आणला होता विवादित एकूण 36 .69 चौरस किलोमीटर जमिनीपैकी आसामला 18.51 चौरस किलोमीटर जमीन आणि उर्वरित 18. 25 चौरस मीटर जमीन मेघालयला देण्यात येईल.

आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांत अनेक वर्षा पासून वाद आहे 1972 मध्ये आसाम मधून मेघालय वेगळा झाल्यानंतर हा जमिनीचा वाद सुरू झाला होता. सीमेवरून वरून दोन राज्यांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाले होते हिंसक अशा घटना घडल्या होत्या 2010मध्ये हिंसाचारात पोलीस गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला होता.

एकूणच ईशान्य कडील सीमावाद सोडवण्यात गृह मंत्री अमित शाह यांना यश आले आहे त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र सीमा वाद कधी सुटणार? या प्रश्नी ते कधी मध्यस्थी करणार ?या प्रश्नाची उत्सुकता बेळगाव मध्ये मराठी भाषिकांना लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.