हनुमाननगर, हिंदवाडी येथील गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह आज रविवारी येळळूर येथे शेतवाडीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.
प्रज्वल बी. महांतशेट्टी (वय 24) असे मयत युवकाचे नांव आहे. गेल्या 9 फेब्रुवारी पासून तो घरातून बेपत्ता झाला होता.
येळळूर येथील एका छोट्या पाण्याच्या प्रवाहात त्याचा मृतदेह आज रविवारी सकाळी आढळून आला आहे. प्रज्वल गुढरित्या बेपत्ता झाल्यानंतर आज त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
सदर घटनेची पोलिसात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.