Thursday, May 2, 2024

/

संस्कृती माणसाला समृद्धी बनवते- दळवी

 belgaum

संस्कृती माणसाला समृद्ध बनविते सीमाभागात मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी साहित्य संमेलने भारावून मराठी साहित्याचा जागर होणे गरजेचे आहे असे मत जेष्ठ पत्रकार साहित्यिक विजयकुमार दळवी यांनी व्यक्त केले

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे 17व्या साहित्य संमेलन साहित्यिकांच्या मांदियाळीत पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांना फाटा देत रसिक श्रोत्यांनी मराठी भाषा दिनी मराठी साहित्याचा जागर केला.

अध्यक्षीय भाषणात  पुढे विजयकुमार दळवी म्हणाले की आज सीमाभागातील मराठी जनता कर्नाटक सरकारच्या जुलमी वरावांटीखाली पिचली जात आहे.मायबोली मराठी भाषेचा गळा घोटाण्यासाठी राजकीय विकलांग मनोवृत्तीची गिधाडे सरसावली आहेत.सीमाभागातील मराठी शाळा आणि मराठीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी मोगलाई हुन भयंकर दृष्टकृत्य इथे घडत आहेत.

 belgaum

लाठीहल्ला,रक्तबंबाळ शरीर,भयभीत होऊन भूमिगत होणारे तरुण आणि तुरुंगवास हेच आजही आपल्या नशिबी आहे.मातृभाषा आणि आपली संस्कृती टिकविणे एवढाच के तो गुन्हा,हे सगळे घडत असताना महाराष्ट्राकडून मात्र केवळ कोरडी फुंकर घातली जाते ही लाजिरवणी बाब अशी खंत त्यांनी व्यक्त केली आणि चंद्र सूर्य असे पर्यंत सीमाभागात मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्य आजच्या तरुणांपर्यंत पोचले पाहिजे संस्कृती माणसाला समृद्ध बनविते असेही दळवी म्हणाले.

दिवंगत एल.आय.पाटील नगरीत पार पडलेल्या संमेलनाचे उदघाटन नेताजी कॉ ऑप.सोसायटी चे चेअरमन डी.जी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष विजयकुमार दळवी हे होते तर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील,प्रमोद पाटील,बाबुराव मुरकुटे,शिवाजी गोरल,रमेश धमणेकर, वकील सुधीर चव्हाण त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.