मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना आयोजित निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान नागराज बसीडोनी याने पैलवान संतोष कडोलकर याचा चौथ्या मिनिटाला एकेरी हाताचा कस चढवून चित करत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं कुस्तीचे मैदान भरवण्यात आले होते या मैदानावर अनेक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या.प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी नागराज बसीडोनी यांनी महाराष्ट्र चॅम्पियन संतोष कडोलकर पुणे यांच्यात झाली.
कुस्ती सुरुवाती पासून रंगतदार झाली पहिल्या मिनिटाला नागराज ने दुहेरी पट लावत संतोष वर ताबा मिळवला पण संतोषने त्यातुन सुटका करून घेतली दुसऱ्या मिनिटाला नागराज ने एकेरी पट काढुन संतोष ला खाली खेचत मानेवर घुटना ठेऊन घुटना फिरवण्याचा प्रयत्न केला पण एकेरी हाताचा कस चढवत संतोषला आस्मान दाखवले आणि उपस्थित कुस्ती प्रेमींची मने जिंकत आनंदवाडीचे मैदान मारलं.
दुसऱ्या क्रमकांच्या कुस्तीत एम ई जी सेंटरचा आकाश घाडी याने राशिवडेचा सौरव पाटील यांच्यात चुरशीची झाली बरोबरीने सुटली.तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदिनकोप्प आणि किर्तीकुमार बेनके ही देखील डाव प्रति डावाने गाजली मात्र वेळे अभावी बरोबरीत सुटली .चौथ्या क्रमांकाची रोहित कंग्राळी आणि सिध्दरुढ धारवाड ही देखील बरोबरीत सुटली.
कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी बेळगावात हे कुस्ती मैदान भरले होते हे कुस्ती मैदान मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून पार पडले यासाठी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.