Sunday, November 17, 2024

/

‘व्हॅलेंटाईन डे’ चा ट्रेंड बदलतोय!

 belgaum

बेळगाव लाईव्ह/विशेष : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं….’ व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं नेहमीच मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती साऱ्या तरुणाईला आठवतात. सोशल मीडियावर तर हल्ली प्रत्येक छोटी गोष्ट हि इव्हेन्ट होत चालली आहे. प्रत्येक गोष्ट हि सर्वाधिक सोशल मीडियासाठी साजरी करणे हा तरुणाईचा आजकालचा ट्रेंड बनत चालला आहे. वास्तववादी टीका टिप्पण्याही याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण व्यक्त करत आहे. मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टीही हल्लीच्या काळात सोशल मीडियावर आधारित अशाच आहेत. काळानुसार मैत्री आणि प्रेमाची व्याख्या बदलत गेली. आणि बदलत्या काळानुसार प्रेमाचं व्यक्त होणं देखील बदलत चाललं आहे.

तस पाहिलं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक वेळेची, विशेष दिवसाची किंवा जागेची गरच नसते. प्रेम ही एक अदभूत भावना असते. ती भावना व्यक्त करताच चेहरा खुलतो, बहरतो. एका जीवाने दुसऱ्या जीवावर केलेली ती एक मुक्त उधळण असते. ३६५ दिवस प्रेमाचे आणि प्रेमासाठीच असतात. परंतु, ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमाचा आणि प्रेमवीरांसाठीचा खास दिवस. परंतु गेल्या तीन वर्षात व्हॅलेंटाईन डे चा ट्रेंड बदलत चालला आहे. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करतांना स्वतःचं देशाप्रती आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी आजच्या तरुणाईने विशेष असा ट्रेंड निर्माण केला आहे.

आपल्यासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची बाजी लावत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु या जवानांच्या सुरक्षेबद्दल काय? असा प्रश्न आजच्या तरुणाईला पडत चालला आहे. आणि १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॅलेंटाईन डे चा ब्लॅक डे सोशल मीडियावर व्हायरल होत चाललाय. १४ फेब्रुवारी रोजी जगभरातील लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात व्यस्त असताना, भारतातील लोक व्हॅलेंटाईन डे ऐवजी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीर जवानांचे स्मरण करत आहेत.

देश प्रेम जागृत करत जवानांनी आपल्या संरक्षणासाठी दिलेली प्राणाच्या आहुतीचे महत्त्व पटवून देण्याचे काम सोशल मीडियाच्यामाध्यमातून तरुणाई करत आहे. संपूर्ण दिवसभरात प्रत्येकाच्या व्हाट्सअप स्टेटसवर, फेसबुक, इन्स्टा, ट्विटरसह अनेक समाजमाध्यमांवर ‘बालक डे’ चा ट्रेंड सुरु आहे. पुलवामा हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले. या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस असून, हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणं आपलं कर्तव्य आहे, असं म्हणत भारतातील नागरिकांनी आपल्या जवानांप्रती आपलं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस असल्याचे संदेश आज दिवसभर सोशल मीडियावर झळकत आहेत.

जग बदलत चाललं आहे.. युवा पिढी डिजिटल माध्यमांकडे आकर्षित होत चालली आहे. परंतु याच बरोबर झपाट्याने सर्वच गोष्टींचे ट्रेंड बदलत चालले आहे. प्रत्येकाला सैन्यदलाविषयी आपुलकी आणि हेवा वाटत असून बेफामपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या तरुणाईकडूनदेखील सैन्यदलासाठी आजचा दिवस ब्लॅक के म्हणून पाळण्यात येत आहे, हे विशेष!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.