बेळगाव महापालिकेने 41 लाख रुपये किंमतीच्या 3कम क्षमतेच्या एका स्मार्ट भुयारी कचराकुंड (अंडरग्राउंड बिन) पुरवठ्यासाठी निविदा काढली आहे. शहरातील हे दुसरे भुयारी कचराकुंडी असणार आहे.
शहरात यापूर्वी बँक ऑफ इंडिया सर्कल शहापूर येथील रवींद्र कौशिक ई-लायब्ररीनजीक पहिले स्मार्ट भुयारी कचराकुंड बसविण्यात आले आहे. या जमिनी खालील कचरा कुंडाची सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली असले तरी ते अद्याप वापरात आणलेले नाही. आता महापालिकेने शहापूर येथील भुयारी कचराकुंडापेक्षा अधिक क्षमतेच्या स्मार्ट कचराकुंडाबाबत निविदा काढली आहे.
सार्वजनिक ठिकाणी रस्त्याशेजारी कोपऱ्या-कोपऱ्यावर वेळोवेळी उचलणं झाल्याने साचून पडणारा केअर कचरा घाण यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता तसेच हवेचे प्रदूषण आणि व्यापली जाणारी जागा यावर पर्याय म्हणून देशातील अनेक प्रमुख मोठ्या शहरांमध्ये स्मार्ट भुयारी कचरा कुंड योजना राबविली जात आहे.
या पद्धतीने कचरा जमिनीखाली साचवला जात असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही सुरत शहरामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी असे 43 भुयारी कचराकुंड बसविण्यात आले आहेत. या प्रत्येक कचरा कुंडाची कचरा साठा क्षमता जवळपास 1 टन आहे.
भुयारी कचरा कुंड (अंडरग्राउंड बिन) हे फुटपाथ अर्थात पदपथा खाली बसविले जातात. कचरा टाकण्यासाठी आणि कचऱ्याची उचल करण्यासाठी असे दोन मार्ग या कचराकुंडाला असतात. भुयारी कचराकुंड आकाराने प्रचंड असल्यामुळे ते उचलण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागतो. या पद्धतीने मनुष्याच्या थेट हस्तक्षेपाविना यांत्रिकरीत्या कुंडातील कचरा रिकामा करून त्याची उचल केली जाते.