राज्यातील सर्व शाळा कॉलेजना तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याचा आदेश कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बजावला आहे.
आगामी तीन दिवसम्हणजे बुधवार ते शुक्रवार राज्यातील सर्व हायस्कूल आणि कॉलेज ना सुट्टी देण्याचा आदेश बजावला आहे. सध्या सुरू असलेला हिजाब प्रकरणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा आदेश बजावला आहे.पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू असणार आहेत.
कर्नाटक राज्यातील सर्व शाळा-कॉलेजच्या विद्यार्थी शिक्षक मॅनेजमेंट आणि सर्व शाळा कॉलेज तसेच जनतेने देखील या हिजाब प्रकरणी शांतता राखावी कुणी कायदा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे.मात्र पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू रहातील असेही आदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळा कॉलेजला सुट्टी देत असताना आज रात्री याचा अधिकृत आदेश जाहीर होईल असे देखील ट्विटरवरून म्हटले आहे
मुख्यमंत्र्यांच्या ट्विट नंतर बुधवारी गुरुवारी शुक्रवारी असे तीन दिवस कर्नाटक राज्यातील सर्व शाळा कॉलेज ना आता सुट्टी असणार आहे. या सुट्टीचा कार्यकाळात सर्वांनी सहकार्य करावे असे देखील मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.नुकताच विकेंड कर्फ्यु आणि कोरोना ने नुकताच सुरू झालेल्या शाळांना या हिजाब प्रकरणामुळे आणखी तीन दिवस सुट्टी मिळाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
I appeal to all the students, teachers and management of schools and colleges as well as people of karnataka to maintain peace and harmony. I have ordered closure of all high schools and colleges for next three days. All concerned are requested to cooperate.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) February 8, 2022