सूर्यनमस्कार व योगा याच्या माध्यमातून युवापिढीने सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे,यासाठी क्रीडा भारती, व योग पतंजलीने पुढाकार घेऊन युवकांसाठी शरीर सुदृढ व योग कार्य नियमितपणे सुरू ठेवणे ही काळाची गरज आहे, तसेच गानकोकिळा लता मंगेशकर यांनी या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच त्यांनी भारतीय सेनेसाठी आर्थिक मदत म्हणून 5 किलो सोने जमा करून भारत सरकारला सुपूर्द करून आपली सामाजिक बांधिलकी जपली होती या गोष्टीलाही डॉ प्रभाकर कोरे यांनी उजाळा देत समस्त बेळगावकर यांच्यावतीने गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
लिंगराज कॉलेजच्या मैदानावर आयुष्यमान भारत सरकारच्या मान्यतेने क्रीडाभारती व पतंजली योग समितीच्यावतीने रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार .व आझादी का अमृत महोत्सव निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ,प्रभाकर कोरे आमदार अनिल बेनके, गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, लक्ष्मण पवार,मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, आरती काँगो, या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता फोटो पूजन, श्रीफळ वाढून पूजन करण्यात आले.
यानंतर किरण मन्नोळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पतंजली योग समितीच्यावतीने डॉ माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर राष्ट्रीय योगा व स्पोर्ट्स फेडरेशनच्या विद्यार्थिनींनी सूर्य गीतावर योगाची प्रात्यक्षिके सादर केली, यानंतर पतंजलीच्यावतीने ,प्राणायाम व आसन व सूर्यनमस्कार उपस्थित विद्यार्थ्याचेकडून करून घेत त्यांचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, कृष्णा भट, आनंद होसुर, आर एस मुतालिक, वासुदेव इनामदार, सुधीर गाडगीळ, कृष्णानंद कामत ,जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी,एस डिग्रज,पीईओ एल बी नाईक, नगरसेवक राजू भातकांडे, संजीव नाईक, पुरुषोत्तम पटेल, व्ही एस पाटील, मोहन बागेवाडी, मोहन पत्तार, ज्योतिबा भादवणकर,एक आर नागराज, रमेश पाचापुरे, हणमंत पाटील, संगीता कोनापुरे ,सी रामाराव ,चंद्रकांत खंडागळे , रोहिणी पाटील,एन एन कातकर,मगनभाई पटेल, परशराम मंगनाईक,उमेश बेळगुंदकर ,बापूसाहेब देसाई, राजू कुडतूरकर, मंजुनाथ गोळीहळ्ळी, सुरेश कळ्ळेकर, जयसिंग धनाजीसह विविध शाळेचे, कॉलेजचे क्रीडा प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र भट, उमेश कुलकर्णी तर विश्वास पवार यांनी आभार मानले.