बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड करण्याचा प्रकार काल रविवारी रात्री घडला असून एका मद्यपी व्यक्तीने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे.
शहर उत्तर विभागाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांचे कार्यालय चव्हाट गल्ली क्रांती सिंह नाना पाटील चौकात आहे. या कार्यालयावर काल रात्री उशिरा त्याच भागातील एका युवकाने मद्यधुंद अवस्थेत दगडफेक करण्याबरोबरच लाकडी टोण्याने खिडक्यांच्या काचांची तोडफोड करून नुकसान केल्याची माहिती समोर येत आहे
आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आमदारांच्या कार्यालया भोवती गराडा घातला होता.
दगडफेकित त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक कोणी आणि कशामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही.
ज्या ठिकाणी आमदारांचे कार्यालय आहे ते ठिकाण शहरातील अतिसंवेदनशील भागांपैकी एक म्हणून ओळखले जाते .दगडफेक ची माहिती पोलिसांना मिळतातच पोलिस, व्हॅनसह चोवीस तास याठिकाणी तैनात आहेत .