उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील भगवान विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर सौंदत्ती यल्लम्मा मंदिराला हायटेक टच देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे.
सौंदत्ती यल्लम्मा येथील श्री रेणुकादेवीचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या १० देवस्थानांपैकी एक आहे.
कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक या देवस्थानाला भेट देतात. यादृष्टीकोनातून मंदिर परिसरात सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे.
राज्य सरकारने काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून हुबळी बेस व्हिजन सोल्युशन्सने सर्वेक्षणाचे काम आधीच केले आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या 2,000 एकर परिसरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे.