पांडेचेरी येथे नुकत्याच पार पडलेल्या मिस्टर इंडिया (मास्टर्स) -2022 शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगावच्या प्रताप कालकुंद्रिकर यांनी रौप्यपदक हस्तगत केले आहे.
पांडेचेरी येथे मिस्टर इंडिया (मास्टर्स) -2022 ही वयस्क शरीर सौष्ठवपटूंसाठी असणारी राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील 45 ते 50 वर्षे विभागातील 80 किलो खालील वजनी गटात प्रताप कालकुंद्रीकर यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक मिळविले.
प्रताप विठ्ठल कालकुंद्रीकर हे शिवाजीनगर येथील रहिवासी असून उपरोक्त यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.