Tuesday, May 7, 2024

/

सरकारने ‘त्या’ हत्येचे गूढ सत्वर उकलावे : जारकीहोळी

 belgaum

शिमोगा जिल्ह्यामध्ये हर्ष नावाच्या युवकाची जी हत्या झाली आहे, त्या हत्येमागील गुढ सरकारने लवकरात लवकर उलगडावे, अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.

हुक्केरी तालुका पंचायतीच्यावतीने यमकनमर्डी मतदार संघातील ग्रामपंचायतींना कचरा उचल करणाऱ्या गाड्यांचे वितरण करण्याचा कार्यक्रम आज मंगळवारी पार पडला या कार्यक्रमानंतर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. आता खुद्द गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हर्ष नांवाच्या एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारने लवकरात लवकर खुन्यांना गजाआड करून या खुनामागील रहस्य उजेडात आणावे, अशी मागणी जारकीहोळी यांनी राज्य सरकारकडे केली.

 belgaum

याप्रसंगी तालुका पंचायत प्रशासकीय अधिकारी उमा सालीगौडर, उमेश सिदनाळ, तहसीलदार डॉ. दोड्डप्पा हुगार, श्रीशैल हिरेमठ, आदींसह विविध ग्रामपंचायतींचे अध्यक्ष ग्रा. पं. सदस्य व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.