बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे सर्व यात्रा-जत्रा, उत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. दोन वर्षानंतर पुन्हा प्रशासनाने यात्रा उत्सवावरील निर्बंध हटविले असून कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या दड्डी मोहनगा येथे श्री भावकेश्वरी देवीची पुन्हा यात्रा भरली आहे.
मोहनगा येथील भावकेश्वरी देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागातील लाखो भाविक येथे दाखल होतात. जागृत देवस्थान अशी प्रचिती असलेल्या या देवस्थानाची यात्रा १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी यादरम्यान होत आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी दड्डी येथे गर्दी केली असून देवस्थान मंडळाने यात्रेची सर्वतोपरी तयारी केली आहे.
मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला असून याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळपासून भाविकांची रीघ देवी दर्शनासाठी लागली असून पुढील पाच दिवस हि यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
असे आहे यात्रेचे स्वरूप :-
गुरुवार दि. १७ फेब्रुवारी २०२२ – शस्त्रइंगळ्या
शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ – भर यात्रा
शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ – पालखी सोहळा
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या हुक्केरी तालुक्यातील दड्डी मोदगे(मोहनगा)येथील लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भावेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला गुरुवारी पासून सुरुवात झाली आहे.कोरोनामुळे तीन वर्षां नंतर ही यात्रा मोठ्या प्रमाणात होत आहे. pic.twitter.com/rMOvv63puE
— Belgaumlive (@belgaumlive) February 17, 2022