राज्यातील निवळत चाललेली कोरोना संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेऊन गोवा आणि केरळ राज्यातून हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी असणारी आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात आली आहे.
आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात आली असली तरीही गोवा आणि केरळ राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे /संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
यापूर्वी अलीकडेच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठीची आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात आली होती.
त्या मागोमाग आता पुढील आदेश येईपर्यंत गोवा व केरळ मधील प्रवाशांसाठी देखील ती माफ करण्यात आली आहे.