Sunday, May 5, 2024

/

बेळगावात हिजाब वाद चिघळला : कॉलेजसमोर निदर्शने

 belgaum

हिजाबला परवानगी द्यावी अशी मागणी करून विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेजमधील एका गटाने कॉलेज प्राचार्यांचा धिक्कार करत अल्ला हू अकबर घोषणा देऊन हाय होल्टेज ड्रामा केल्यामुळे कांही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी कांही युवकांना ताब्यात घेतले आहे.

कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थिनी आज गुरुवारपासून कॉलेजमध्ये वर्गात येताना हिजाब परिधान करू नये अशी सूचना विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी केली होती. मात्र तरीही आज सकाळी विद्यार्थिनी हिजाब घालून कॉलेजला आल्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

त्यामुळे कॉलेजच्या गेटवर जमा झालेल्या हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना बोलावून घेतले आणि त्यांना प्राचार्यांनी काढलेल्या आदेशाची माहिती दिली. दरम्यान सदर प्रकाराची माहिती मिळताच युवकांचा एक गट त्याठिकाणी दाखल झाला आणि त्यांनी कॉलेज आवारात शिरुन प्राचार्यांचा धिक्कार करत अल्ला हू अकबर घोषणा देऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

 belgaum

Hijab row

आमच्या धर्माचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगून कॉलेजचे प्राचार्य आमच्या धार्मिक भावना पायदळी तुडवत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी संबंधित युवक करताना दिसत होते. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये हिजाब प्रकरण विचाराधीन आहे. तेंव्हा घोषणाबाजी करून गोंधळ घालू नका. शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्था बिघडवू नका असे सांगून गोंधळ घालणाऱ्या युवकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलीस अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पोलीस अधिकाऱ्यांचे न ऐकता कांही युवकांनी अल्ला हू अकबर ही घोषणा देण्यास सुरुवात केली. परिणामी पोलिसांनी संबंधित युवकांना पकडून एपीएमसी पोलिस ठाण्यात नेले आहे. या सर्व प्रकारामुळे विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज परिसरात कांही काळ तणाव निर्माण झाला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.