हिजाब घातल्यामुळे उसळलेल्या हिंसाचारामुळे बंद करण्यात आलेल्या दहावीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गुरुवारी दिले.
माध्यमांशी बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
“मी सर्वांना एकत्र काम राहण्याचे आवाहन करतो आणि महाविद्यालयांमध्ये शांतता बाळगावी. दहावीपर्यंतच्या वर्गांसाठी सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. पदवी महाविद्यालये नंतर सुरू होतील,”असे ते म्हणाले.
आगामी 14 फेब्रुवारी पासून दहावीचे वर्ग पूर्ववत होतील तर त्यानंतर कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय होईल अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
हिजाबच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात नववी दहावी आणि कॉलेजच्या कॉलेजला तीन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मुख्यमंत्री बोम्मई यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एच बी नागेश आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण आणि अधिकाऱ्यां सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली
कर्नाटक राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त जिल्हा पंचायतीचे सी ई ओ आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे सोबत व्हीडिओ कॉन्फरन्स सोबत बैठक करून योग्य परिस्थिती हाताळा अश्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री माध्यमिक प्राथमिक शिक्षण मंत्री आणि गृहमंत्री राज्यातील सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत एकूणच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची दखल सरकार घेणार असून राज्यात शांतता नांदावी यासाठी आमचा पहिला प्राधान्य राहणार आहे असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
कोणत्याही राजकीय पक्षाने प्रेरित होऊन दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये असे आवाहन बसवराज बोम्मई यांनी केले