बेळगाव शहरातली रहदारीची समस्या दूर व्हावी यासाठी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पुढाकार घेतला असून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दोन मोठे फ्लावर निर्माण करा अशी मागणी केली आहे.
सोमवारी दुपारी बेळगाव दौऱ्यावर आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना बेळगावचे आमदार अनिल बेनके यांनी भेट घेऊन अनेक मागण्यांची पूर्तता करावी अशा स्वरूपाचं निवेदन दिले आहे.
बेळगाव शहरात होणारी ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (पुणे बेंगलोर हायवे) के एल ई हॉस्पिटल ते गोगटे सर्कल पर्यंत म्हणजेच रेल्वेस्थानकापर्यंत फ्लाय ओव्हर निर्माण करा अशी मागणी अनिल बेनके यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या फ्लाय ओव्हर मुळे बेळगाव शहरातल्या रहदारीच्या समस्येला चाप बसेल असं बेनके यांनी निवेदनात म्हटले आहे त्याशिवाय न्यू गांधी नगर पासून ते राणी चन्नम्मा सर्कल पर्यंत हा देखील फ्लाय ओव्हर करा त्यामुळे देखील रहदारीची समस्या मिटेल.
शहरात हे दोन फ्लाय ओव्हर झाल्यास बेळगाव शहरातली रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात मिटु शकते त्यामुळे गडकरी यांनी या दोन मागण्या मान्य करावे असे देखील बेनके यांनी म्हटले आहे
या शिवाय आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव उत्तर भागातील नवीन सीसी रोड बनविण्याची देखील मागणी केली आहे त्यामध्ये विशेषता कणबर्गी ते बसवन कुडची आणि राष्ट्रीय महामार्ग जवळ बसवन कुडची जवळील रोड याशिवाय बसवन कुडची ते अलारवड कॉलनी ते केएचबी कॉलनी पर्यंत च्या रस्त्यांचे रुंदीकरण करा असे देखील त्यांनी म्हटलंय.
आमदार अनिल बेनके यांनी सभा संपल्यानंतर नितीन गडकरी यांची थेट मंचावर भेट घेतली जवळपास दोन तीन चार मिनिटे चर्चा करून ह्या मागण्या केल्या.