कुद्रेमनी येथील एका महिलेने ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व कर्मचाऱ्यांना निष्कारण अर्वाच्च शिवीगाळ केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ संतप्त पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी सकाळी कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.
कुद्रेमनी ग्रामपंचायत अध्यक्षा रेणुका नाईक, उपाध्यक्ष विनायक पाटील तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांना एका महिलेने अर्वाच्य शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.
सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह मराठा समाजातर्फे करण्यात आला आहे. तसेच त्याच्या निषेधार्थ आज बुधवारी सकाळी कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले.
महिलेने केलेल्या अर्वाच्च शिवीगाळ प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवून देखील कोणतीच कारवाई न होता उलट माझे काय वाकडे करून घेतले अशा शब्दात पुन्हा संबंधित महिलेने अवमान केल्यामुळे. बुधवारी मराठा समाजातर्फे आज हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप बेळगाव ग्रामीण माजी अध्यक्ष विनायक कदम, मराठा समाज नेते नारायण झंगरूचे, ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका रामू नाईक, उपाध्यक्ष विनायक नारायण पाटील, सदस्य संजय पाटील अरुण देवळे, शिवाजी मुरकुटे, लता शिवणगेकर, विमल साखरे, आरती लोहार मल्लव्वा कांबळे आदी उपस्थित होते.