पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पहाणी केलेल्या काही तासांतच के एस आर टीसी च्या एम डी नी देखील नव्याने बनवण्यात येत असलेल्या बेळगाव शहराच्या बस स्थानकाच्या कामाची पहाणी केली.
कालच पालकमंत्री कारजोळ यांनी बस स्थानकाची पहाणी करून स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची ठेकेदाराची कानउघडणी केली होती आगामी डिसेंबर महिन्याच्या आत शहरातील सर्व स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करा अश्या सूचना दिल्या होत्या.
शनिवारी सायंकाळी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कळसद यांनी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या बेळगाव सिटी बस टर्मिनसला भेट दिली. तसेच NWKRTC द्वारे बांधण्यात येत असलेल्या बेळगाव बसस्थानकाचा आढावा घेऊन त्यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, बेबी केअर सेंटर, बस स्थानकावर पार्सल आणि कुरिअर सेवा केंद्र, छतासाठी सोलर पॅनल आदीं कामांची त्यांनी पाहणी केली.
बेळगावच्या हायटेक बस स्थानकावर सिंगल युज रिसायकल मशीन बसवा अश्या सूचना देखील त्यांनी स्मार्ट सिटी आणि परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या. गेली तीन वर्षा पासून या नव्या बस स्थानकाचे काम प्रलंबित आहे.