belgaum

भेंडी बाजार मधील कपड्याच्या दुकानाला आग-लाखोंचे नुकसान

0
Fire
 belgaum

गेल्या 24 तासांत बेळगाव शहरात तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असुन लाखोंचा मुद्देमाल आगीत जळून खाक झाला आहे.

शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भेंडी बाजार येथील महिलांच्या रेडी मेड गारमेंट दुकानात आग लागली आहे.घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोचल्या असून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

भेंडी बाजार मध्ये कपड्याची दुकाने मोठ्या संख्यने असल्याने पोलीस आणि फायर ब्रिगेड कडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.Fire

 belgaum

काल आझाद नगर येथील गादी कारखाना जळाला होता त्या नंतर शनिवारी दुपारी सावंगाव रोड वरील हॉटेल मध्ये आग लागली होती आता भेंडी बाजार मधील ‘राजी कलेक्शन’ या महिलांचे रेडिमेड कपडे विक्री करणाऱ्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी मार्केट पोलिसांनी धाव घेतली असून आग इतरत्र पसरू नये याची काळजी घेतली जात आहे.एकूणच वाढत्या गर्मीत दुकानांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.