मुखवाडा अल्लदावनू 84 या चित्रपटाचा दुसरा भाग असणाऱ्या ‘मुखवाडा 008’ या चित्रपटाचे चित्रीकरण उद्या शनिवारपासून बेळगाव शहरात सुरू होणार आहे. डॉ. गणपत पाटील हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवकुमार (काडूर) हे दिग्दर्शक आहेत.
शहरामध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉ. गणपत पाटील यांनी उद्या शनिवारपासून बेळगाव शहरात होणार या चित्रपटाच्या चित्रीकरणाची माहिती दिली.
हा चित्रपट अध्यात्मिक पठडिचा असून प्रसंगानुसार मनुष्याच्या मनात कसे बदल होतात हे यात दाखविण्यात आले आहे. सदर चित्रपटाचे चित्रीकरण बेळगावसह म्हैसूर, मडिकेरी, कोलार व अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी या चित्रपटाचा पहिला भाग राज्यभरातील 60 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा दुसऱ्या भाग किमान 100 चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे असे सांगून सदर चित्रपटात बेळगावातील होतकरू कलाकारांना संधी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. गणपत पाटील यांनी दिली.
चित्रपटाचे दिग्दर्शक शिवकुमार (काडूर) यांनी ‘मुखवाडा 008’ या चित्रपटात 10 गाणी आणि 4 हाणामारीचे दृश्य आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा व्यावसायिक स्वरूपाचा असल्याचे सांगितले. शिवकुमार यांनी यापूर्वी तीन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पत्रकार परिषदेस सहाय्यक दिग्दर्शक हरीश सारा आणि कॅमेरा गिरीष हे उपस्थित होते.