Thursday, January 2, 2025

/

गवताच्या गंज्याना आग चारा भस्म

 belgaum

अतिवाड येथील पाच शेतकऱ्यांच्या नऊ गवताच्या गंज्याना आग लागल्याने एक लाखाहून अधिक रुपयांच्या गवताचे नुकसान झाले आहे.सोमवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार अतिवाड येथे कोवाड उचगाव रोड वरील डोंगराळ भागात शेतकऱ्यांनी कापणी करून साठवलेल्या करड गवताच्या 9 गंज्याना अचानक आग लागली या आगीत शेतकऱ्यांनी साठवलेला चारा आगीत जळून खाक झाला.

बुध्दाप्पा कणबरकर,आनंद पाटील,यल्लप्पा पाटील, मारुती पाटील या शेतकऱ्यांचा चारा आगीत जळाला आहे.

आगीत जळालेल्या गवताचा पंचनामा करण्यात आला असून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वाढू लागली आहे.

आधीच पावसाने गवताचे नुकसान झाले असून सुक्या चाऱ्याचा आधीच तुटवडा जाणवत आहे त्यात आगीत चारा भस्म झाल्याने जनावरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.