गोवावेस येथील कार्पोरेशन कॉम्प्लेक्स मधील त्या 56 गाळेधारकांनी खासदार मंगला अंगडी यांना साकडे घातले असून आणखी कमीत कमी पाच वर्ष तरी सदर कॉम्प्लेक्स पाडवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
कार्पोरेशन कॉम्प्लेक्स मधील त्या 56 गाळेधारकांना 15 दिवसाच्या आत कॉम्प्लेक्स मधील दुकानं खाली करा अशी नोटीस बेळगाव महापालिकाने बजावली आहे सदर कॉम्प्लेक्स जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारकांनी खासदार अंगडी यांची भेट घेऊन सदर कॉम्प्लेक्स मधील दुकानांना पाच वर्ष आणखी अवधी वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे.
केवळ मागील बत्तीस वर्षापूर्वी सदर कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून आणखी पंधरा ते वीस वर्ष या कॉम्प्लेक्स चे बांधकाम सहज टिकू शकते असं व्यापाऱ्यांनी खासदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या तीस वर्षापासून आम्ही या दुकानात भाडेकरू आहोत जवळपास तीनशे ते चारशे कुटुंबे या दुकानातून रोजगार करून उपजीविका करतात दरमहा नियमितपणे मनपाला भाडे देत आले आहेत त्यामुळे आणखी कमीत कमी पाच वर्ष अवधी वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनाचा स्वीकार करत यासंदर्भात आपण स्वतः मनपा आयुक्तांशी बोलणार आणि नक्कीच गाळेधारकांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन खासदार मंगला अंगडी यांनी या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या कानावर देखील व्यापाऱ्यांनी सदर गाळेधारकांनी हा मुद्दा घातला असून त्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.