कणकुंबी (ता. खानापूर) येथे भाजपा ग्रामांतर महिला मोर्चा उपाध्यक्षा व खानापूर येथील महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल 150 आशा वर्कर्स, मदतनीसांसह अंगणवाडी शिक्षिका, कांही बचत गट आणि आरोग्य सेवा कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चेतन यांचा सत्कार करण्यात आला.
खानापूर सारख्या जंगलमय प्रदेशात आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या आदी कोरोना योद्ध्यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात मुसळधार पावसामध्ये प्रतिकूल वातावरण असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनसेवा केल्याबद्दल डॉ. सोनाली सरनोबत आणि त्यांच्या टीमने आज शुक्रवारी कणकुंबीच्या श्री माऊली देवस्थानांमध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी मंचावर स्थानिक नेते, भाजपचे कार्यकर्ते मंजुनाथ चिखलकर, संजय पाटील, बसवराज कडेमानी, नारायण कदम, दयानंद चोपडे, अनंत गावडा, अर्जुन गावडा,ईश्वर सानिकोप, ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते
डॉ. सोनाली सरनोबत यांनी सर्व कोरोना योद्ध्यांचा स्मृतिचिन्ह आणि जीवन विमा कार्ड देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फौंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील गरीब गरजू लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रेशन वाटप, रस्ते आणि मूलभूत समस्यांचे निवारण आदी उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच बचत गटांना भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.