ऑपरेशन मदत’ तर्फे बेळगांव जिल्ह्यातील कित्तुर तालुक्यातील एम के हुब्बळी गावानजीकच्या अमरापूर व विरपूरा या गावातील बारा कुटुंबांना एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे. या गावातील (कोरोना, पूरपरिस्थिती, अपघाती अपंगत्व, विकलांग व गरजू) अशा जवळपास बारा कुटुंबांना एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे.
त्या कुटुंबातील सदस्यांना 2021 च्या एप्रिल महिन्यापासून यांना दर महिन्याला अन्नधान्य सामुग्री, कपडेलत्ते, लाईट, मुलां-मलींसाठी शैक्षणिक साहित्य, थोडेसे पैसे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.
प्रत्येकवेळी प्रसाद हुली व राहुल पाटील हे कार्यकर्ते आपल्या सोबत वेगवेगळ्या व्यक्तींना किंवा संस्थेला घेऊन जातात. जेणेकरून ही सामाजिक बांधिलकीची जाणीव इतरांनाही प्रेरणा देऊन जाईल. यावेळी आरूषी कंकनमेली या बेंगलोर येथे सॅमसंग कंपनीत सर्विस करणाऱ्या महिलेने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेशन पुरविले.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला व त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. तसेच पुढील काळात प्रयत्न करून स्वत:चा धंदा सुरू करावा असे आवाहन केले. या भेटीदरम्यान प्रसाद हुली, आरूषी कंकनमेली, रमेश हादीमनी पत्रकार बसवराज पाटील, जगदीश गस्ती कुटुंबीय व राहुल पाटील उपस्थित होते.