कर्नाटकात सध्या पेटलेल्या हिजाब (बुरखा) विरुद्ध भगवा या वादावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अखेर मौन सोडले असून विद्यार्थ्यांनी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. उद्या याबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली येथे आज सोमवारी मुख्यमंत्री मुंबई पत्रकारांशी बोलत होते. कांही दुष्ट शक्ती हा वाद उकरून काढत आहेत. महाराष्ट्रातही यापूर्वी असा वाद झाला होता.
हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक बोलणार नाही. उद्या न्यायालय यावर निकाल देणार आहे. त्यानंतरच सरकार पुढील निर्णय घेईल. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत शांतता बिघडवण्याचे काम करू नये.
आंतरराज्य पाणी नियोजनासंदर्भात बोलताना कर्नाटकाचा न्यायसंमत पाण्याचा वाटा आम्ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
पाण्याच्या बाबतीत आम्ही तडजोड करणार नाही. नदीजोड प्रकल्पाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे ती आम्ही केंद्रासमोर स्पष्टपणे मांडू, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सांगितले.