Sunday, December 1, 2024

/

यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेट

 belgaum

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व जलसंपदामंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाने घेत कर्नाटकातील विविध मागण्या पूर्ण करा अशी विनंती केली.विशेषता बेळगाव जिल्ह्यामध्ये सैनिक स्कूल सुरू करा व त्याला अनुदान द्या अशी मागणी या शिष्टमंडळाने केली

संगोळी रायण्णा यांच्या संगोळी गावांमध्ये 189 कोटी खर्च करून सैनिक स्कूल उभारण्यात येत आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे त्या सैनिक शाळेला अधिकृत दर्जा द्यावा अशी मागणी बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे.

सैनिक स्कूल संस्था आणि बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी संगोळी येथे जाऊन न सैनिक स्कूल ला भेट देऊन पाहणी केली होती या सैनिक स्कूलच्या नियमानुसार ही शाळा बनवण्यात आली असून सैनिक स्कूल संस्थेच्या वतीने या शाळेला अधिकृत परवानगी दिली जाणार आहेBommai rajnath singh

राष्ट्रीय महामार्ग तुरुकमट्टी जवळ आय टी पार्क उभारण्यासाठी सर्व्हे क्रमांक 1304 ते 1349 पर्यंतची ७४५ एकर सरकारी मोकळी जमीन द्यावी असा प्रस्ताव दिला आहे .

सदर जमीन प्रथम सैन्याकडून सुवर्ण सौधासाठी विचारात घेतली होती परंतू सुवर्ण सौध हलगा येथे हलविण्यात आले आणि ही जमीन आता राज्य सरकारच्या नावावर आहे. ही जमीन कर्नाटक राज्याची असल्याचा दावा त्यांनी केला मात्र संरक्षण खात्याने सदर जमीन आय टी पार्क उभे करण्यासाठी द्यावी अशीही मागणी या शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.