स्थानिक नेत्यांचे प्रयत्न, बेळगावमधील उद्योगांची प्रगती आणि वाढता पसारा, विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांचे प्रयत्न, यामुळे उडाण योजनेच्या इतिहासात बेळगावचे विमानतळावर संपूर्ण देशातील सर्वाधिक मार्गावर सेवा वाजविणाऱ्या यादीत समाविष्ट झाले आहे. बेळगाव विमानतळ आता कर्नाटकातील तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.
इंडिगो, स्पाइसजेट, स्टार एअर, अलायन्स एअर आणि ट्रू-जेट या पाच विमान कंपन्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 13 मार्ग आणि 34 फ्लाइट ऑपरेशन्स प्रदान केले आहेत. विशेष म्हणजे, उडान योजनेंतर्गत कोणत्याही विमानतळाने मिळवलेल्या हवाई मार्गांची ही सर्वाधिक संख्या आहे.
स्पाइसजेट, इंडिगो, अलायन्स एअर आणि ट्रुजेट यांनी उडान योजनेअंतर्गत प्रदान केलेल्या सर्व मार्गांवर सेवा सुरु केल्या आहेत. स्टार एअरने आतापर्यंत 7 मार्गांसाठी बेळगावमधून सेवा सुरु केली आहे. शिवाय जयपूर आणि नागपूरसाठीही सेवा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.
सध्या बेळगाव विमानतळावर दरमहा 29,000 ते 30,000 च्या आसपास प्रवासी विमानातून प्रवास करत आहेत. हि संख्या पाहता बेळगाव विमानळावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे हे निदर्शनास येते.
दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वरच्या दिशेने वाढत असून बेळगाव विमानतळाला सर्वाधिक आरसीएस मार्ग कार्यरत असलेले अंडरसर्व्हड एअरपोर्ट या श्रेणी अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे.