राज्यात हिजाबवर बंदी नसली तरी कांही सरकारी अधिकारी पूर्ण माहिती न घेता मुस्लीम धर्मीय मुलींवर हिजाब न वापरण्याची सक्ती करत आहेत.
याचा आपण निषेध करत असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा निधर्मी जनता दलाचे अध्यक्ष जिल्हा फैजुल्ला माडीवाले यांनी दिली आहे.
फैजुल्ला माडीवाले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात म्हंटले आहे की, आपण या कृतीचा निषेध करत असून जर आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला याची भरपाई करावी लागेल. आमच्या बहिणी हिजाब परिधान करतात हा त्यांचा अधिकार आहे.
कुराण आणि राज्यघटना यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. जे घटनेचा अनादर करतात त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी व त्वरित तोडगा काढावा, अशी मागणीही निजद जिल्हाध्यक्ष फैजुल्ला माडीवाले यांनी केली आहे.