सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर,एकाचा मृत्यू- बेळगाव – गेल्या सलग दोन दिवसात बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी हजारांचा आकडा पार केलेला दिसून येत आहे.
आज बुधवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीन नुसार बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1060 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हुक्केरी तालुक्यातील एकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.गेल्या 24 तासातील 1060 नव्या रुग्णांपैकी बेळगाव तालुक्यातील 281 याच्यासह,अथणी 142,गोकाक 156,रायबाग 80,
सौंदत्ती तालुक्यात 55,खानापूर तालुक्यात 105, बैलहोंगल 85,हुक्केरी 94 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
6733 रुग्ण उपचार घेत आहेत.3227जणांचा अहवाल अध्याप प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत कोरोना मुळे जिल्ह्यात 977 जणांचा मृत्यू झाला आहे.