लोकप्रतिनिधीना कधी,कोणत्या कामासाठी फोन करावा याचे तारतम्य आता जनतेला राहिलेले नाही असे दिसून आले आहे. युवकाला दारूची तलप लागली त्याने बार गाठला…
मात्र त्या बार मध्ये प्रवेश नाकारला म्हणून तरुणाने थेट आमदारालाचं फोन लावला आमदाराने फोन उचलला नाही या प्रश्नात आमदार लक्ष घालत नाही म्हणून दारूच्या नशेत असलेल्या युवकाने चक्क आमदाराच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या अन त्याला जेलची हवा खायला लागली.ही घटना बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीत घडली आहे.
आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केल्या प्रकरणी युवकाला मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
सत्यम नाईक वय 22 असे त्या युवकाचे नाव असून तो चव्हाट गल्लीचाच रहिवाशी आहे.मार्केट पोलिसांनी आरोपी सत्यमवर आय पी सी कलम 448,426,427,R/W 34 नुसार कारवाई करत अटक केली आहे. मार्केट पोलीस निरीक्षक तुळशीगेरी आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली .या प्रकरणाचा बोध घेऊन जनतेने कुणीही लोकप्रतिनिधी आपले सेवक आहेत त्याचा वापर चांगल्या कामासाठी करून घ्यावा याचे भान बाळगले पाहिजे.
विशेष म्हणजे संशयित आरोपी सत्यमचे वडील बाळू नाईक हे आमदार बेनके यांचे जवळीक मानले जातात दारूच्या नशेत जवळीक असलेल्या आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक केल्याने याची चर्चा रंगू लागली आहे.