पोलीस म्हटलं की तो खाक्या आणि रुबाबदार बोलणं समोर येते मात्र बेळगाव शहर पोलीस दलातील पोलीसाने आपल्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वांशी सुमधुर संबंध बनवत स्वतःची पब्लिक फ्रेंडली इमेज बनवली आहे.तोच जनस्नेही पोलीस आज सेवा निवृत्त झाला आहे.
मार्केट पोलीस स्थानकात सेवा बजावत असलेले पब्लिक फ्रेंडली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार अंची यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. नंदकुमार अंची यांनी केल्या 30 वर्षाच्या काळात बेळगाव शहरातील विविध पोलिस स्थानकात सेवा बजावली होती अलीकडेच ते मार्केट पोलीस स्थानकात ए एस आय म्हणून कार्यरत होते.
आपल्या पोलीस सेवेच्या कार्यकाळात अंची यांनी सर्वसामान्य जनते बरोबर मित्रत्वाचे नाते जपले होते त्यामुळे त्यांची ओळख पोलीसमित्र अशी बनली होती. जनते बरोबर पोलीस फ्रेंड पोलिसाची भूमिका ते निभावत होते त्यामुळे ते ज्या पोलिस स्टेशन मधे ते सेवव बजावत असत त्या ठिकाणच्या जनतेशी मिळून मिसळून वागत होते त्यामुळे ते लोकप्रिय होते.
अंची हे मार्केट पोलीस स्थानकाच्या विशेष पथकात कित्येक वर्षापासून कार्यरत होते. नेहमी पोलीस दलात जनतेशी सतत हसरा चेहरा कायम हसत राहणारी व्यक्ती म्हणून पाहिले जात होते.
दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे निवेदन देण्यासाठी येणाऱ्या सगळ्यांशी संघटना कार्यकर्ते त्यांनी गोडीने संबंध बनवले होते.डी सी ऑफिस समोर कव्हरेजला जाणाऱ्या साऱ्या पत्रकारांशी देखील त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध बनवले होते.सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला