युक्रेनमध्ये अडकलाय आणखी एक विद्यार्थी

0
7
Ukrain
 belgaum

युद्धभूमी झालेल्या युक्रेनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी एक विद्यार्थी अडकून पडला असल्याची माहिती समोर आली आहे. निपाणी तालुक्यातील कारदगा येथील सुरज भागोजी हा विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम शिकत आहे.

गेल्या चार वर्षापासून तो युक्रेनमध्येच आहे. आपला मुलगा युद्धभूमी झालेल्या युक्रेनमध्ये अडकून पडल्याबद्दल सुरजची आई राणी भागोजी यांनी प्रसारमाध्यमांसमोर चिंता व्यक्त केली आहे.

Ukrain

 belgaum

काल रात्री माझे माझ्या मुलाशी फोनवर बोलणे झाले. त्याने आपण सुरक्षित आहोत असे सांगितले आहे. मात्र आज सकाळपासून मी फोन करत आहे मात्र तो फोन उचलत नसल्यामुळे मला चिंता वाटत आहे, असे राणी भागोजी यांनी सांगितले.

राज्य सरकारने माझ्या मुलाच्या सुरक्षेच्यादृष्टीने तसेच त्याला सुखरूप भारतात आणण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणीही भागोजी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.