Monday, April 29, 2024

/

मटका बुकीकडून लाख रुपये घेतलेले पोलीस निलंबित

 belgaum

मटका बुकी कडून एक लाख रुपये लाच स्वीकारलेले हेडकॉन्स्टेबल आणि सहाययक पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ एम बोर्लिंगय्या यांनी बजावले आहेत.

खडे बजार पोलीस स्थानकाचे एस आय हत्तीकट्टी आणि एसीपी क्राईम विभागाचे हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील या दोघांची पोलीस आयुक्तांनी चौकशी करून निलंबित करण्याचा आदेश बजावला आहे.

बेळगाव शहरात सुरू असलेला मटका आणि जुगाराला या आयएसआय आणि हेडकॉन्स्टेबलकडून सहकार्य असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.Suspend logo

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी शहरातील एका मटका बुकी कडून या निलंबित ए एस आय आणि हेड कॉन्स्टेबल यांनी एक लाख रुपये लाच घेतल्याची माहिती आली.

असता पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या यांनी या दोघांची पोलीस आयुक्तालयात बोलून चौकशी केली असता चौकशीत त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने दोघांना निलंबित करण्याचा आदेश बजावण्यात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.