दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बी एस येडीयुरप्पा रोडवर घडली आहे.शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान जुने बेळगाव नाक्याजवळ ओल्ड पी बी रोडवर हा अपघात झाला आहे.
ओमकार लक्ष्मण गडकरी वय 19 रा लक्ष्मी गल्ली जुने बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर ओम राजू नावगेकर हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील मयत युवकाच्या मागे आई वडील दोन विवाहित बहीणी असा परीवार आहे शनिवारी दुपारी जुने बेळगाव येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या मयत युवक शुक्रवारी रात्री येडीयुरप्पा ओल्ड पी बी रोड वरून जुने बेळगावकडे मित्रासोबत दुचाकीवरून घरी येत होता त्यावेळी दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळून अपघात झाला त्यात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची बेळगाव दक्षिण रहदारी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
जुने बेळगाव नाका ते बळळारी नाला रोड वर रात्रीच्या वेळी होणाऱ्या किरकोळ अपघातात देखील वाढ झाली आहे.