व्याजि धंदा करणाऱ्या महिलेचा भरदिवसा गोळ्या झाडून
खून केल्याची घटना संकेश्वरमध्ये रविवारी घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून पोलीस तपास सुर आहे.
हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरमध्ये रविवारी एका महिलेची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
५६ वर्षीय शैला निरंजन सुभेदार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीने तिच्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडल्याने ती जागीच ठार झाली आहे.घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले असून परिसरात घबराट पसरली आहे
या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयत महिला व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होती. पैशांच्या वादातूनच तिचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.