Saturday, January 4, 2025

/

सुधारित मार्गदर्शक सूची जारी : वीकेंड कर्फ्यू मागे

 belgaum

कर्नाटक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशीवरून राज्य सरकारने कोरोनासंदर्भात आज शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे.

राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने राज्यातील सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि रुग्ण संख्येचा नव्याने अभ्यास करून आढावा घेतला आहे. त्यानुसार असे आढळून आले आहे की, कोरोनाच्या मागील लाटांच्या तुलनेत यावेळी गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण फारच कमी आहे.

त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांचे प्रमाण मागील 16 ते 21 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी फक्त 5 टक्के आहे. पूर्वीच्या लाटांवेळी उपचारांती कोरोना मुक्त होण्यासाठी 14 दिवस लागत होते, आता 7 दिवसात रुग्ण बरे होत आहेत. रिकव्हरी रेट देखील 50 टक्के झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून तज्ञांच्या शिफारशीवरून राज्य कार्यकारी समितीच्या चेरमननी सुधारित नवी मार्गदर्शक सूचीचा आदेश जारी केला असून तो येत्या 31 जानेवारी 2022 पर्यंत कायम राहणार आहे. नवी सुधारित मार्गदर्शक सूची पुढीलप्रमाणे आहे.

1) दर शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू केला जाणारा वीकेंड कर्फ्यु मागे घेण्यात आला आहे. पूर्वीच्या आदेशानुसार नाईट कर्फ्यू मात्र दररोज रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहील. पुढे नवी रुग्ण संख्या आणि उपचारासाठी दाखल रुग्णांचा आढावा घेऊन उपाय योजना केल्या जातील,

2) विकेंड कर्फ्यू रद्द करण्याव्यतिरिक्त इतर निर्बंध आणि आदेश पूर्वीप्रमाणेच राहील, 3) मेळावे, धरणे, सभा -परिषदा, सामाजिक -धार्मिक -राजकीय आंदोलन, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका आदींवर बंदी असेल. तथापि लग्न समारंभांना खुल्या जागेत 200 पेक्षा अधिक आणि बंदिस्त जागेत 100 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहू नये, या अटीवर परवानगी असेल. समारंभात कोरोना नियमांचे सक्तीने पालन केले गेले पाहिजे, 4) पब्स, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स आदी 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र त्यासाठी पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश दिला जावा आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जावे. याच पद्धतीने चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, रंगमंदीरं, सभागृह आदी ठिकाणं एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

मात्र येथे देखील पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश दिला जावा आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जावे, 5) राज्य सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रक /मार्गदर्शक सूचीनुसार महाराष्ट्र, केरळ आणि गोवा राज्याच्या सीमेवर कडक तपासणी प्रक्रिया राबविली जावी. उपरोक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 आणि कर्नाटक महामारी कायदा -2020 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.