विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आल्यामुळे शहरातील सर्व व्यवसाय आणि व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. बाजारपेठेत आज शनिवारी गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहारासह उलाढाल पुन्हा पूर्ववत जोमात सुरू झाली आहे
मागील दोन आठवड्यात शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू काळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा देण्यात आली होती तथापि वीकेण्ड कर्फ्यूच्या धास्तीने नागरिक बाजारपेठेकडे फिरकले नसल्यामुळे तसा शुकशुकाटच पहावयास मिळाला होता मात्र आता वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आल्यामुळे आज सकाळपासून शनिवारी शहरातील काकती वेस, शनिवार खूट, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, फोर्ट रोड आदी ठिकाणी नागरिकांची नेहमीप्रमाणे खरेदीसाठी वर्दळ सुरू झाल्याचे पहावयास मिळाले.
सर्वकाही सुरळीत सुरु झाल्याने विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची संख्या वाढली होती. बाजारपेठेसह सट्टा बाजार आणि हॉटेल्स लोकांच्या अधिक उपस्थितीने सुरू झाली आहेत. वीकेंड कर्फ्यु रद्द झाल्याने शहर उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर लोकांची वर्दळ वाढली आहे. शहरासह टिळकवाडी, शहापूर आदी उपनगरातील मार्केटमध्ये फुल्ल गर्दी होऊन आज ते गजबजलेले दिसत होते. तथापि बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने कोरोनाच्या दृष्टिकोनातून हे धोकादायक आहे.
बाजारात येणारे नागरिक सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष करत असून कांहीजण तोंडावर मास्क नसताना फिरताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात होणारी गर्दी चिंताजनक आहे. लोकांनी हे विसरू नये की वीकेंड कॅफेरेयू रद्द झाला आहे, पण कोरोना सुट्टीवर गेलेला नाही. जीवाला धोका होता. त्यामुळे प्रत्येकाने कोविडचे नियम आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करावे लागत आहे.
दरम्यान, सरकारने देखील तसे सूचित केले आहे. इस्पितळांमध्ये कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण 5 टक्के आहे. हे प्रमाण वाढल्यास पुन्हा विकेंड कर्फ्यू लागू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सरकारने जारी केलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे. संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.