Thursday, December 26, 2024

/

‘विमल’तर्फे बीम्समध्ये नूतनीकरण -पेंटिंग

 belgaum

कोरोनासह ओमिक्राॅनच्या वाढत्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्याला सहकार्य करताना भाजप युवा नेते आणि विमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी बीम्स हॉस्पिटलमधील एका विभागाचे मोफत नूतनीकरण व रंगरंगोटी करण्याची जबाबदारी उचलली आहे.

कोरोनासह ओमिक्राॅन व्हेरीएंटच्या वाढत्या संसर्गामुळे बेळगावातील बीम्स हॉस्पिटलमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते आणि विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी नुकतीच हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत

आणि स्वच्छता देखील राखली जात असून बहुतेक वॉर्डांमध्ये नव्या उपकरणांसह सुधारणा करण्यात आली आहे असे सांगितले. तसेच आता विमल फाउंडेशनतर्फे बीम्स हॉस्पिटलमधील रेस्पिरेटरी इंटेन्स केअर युनिट या विभागाचे नूतनीकरण आणि पेंटिंग करून दिले जाईल, असेही स्पष्ट केले.

Bims painting

दरम्यान, ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण राज्यासह बेळगाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणमी सतर्क झालेल्या बेळगाव जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बीम्समध्ये 55 बेड्सची सोय असलेले 3 कोरोना वॉर्ड सज्ज ठेवले आहेत.

बेंगलोर धारवाड आणि हासन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण आढळून येत आहेत. तसेच शेजारील महाराष्ट्र आणि केरळ राज्यामध्येही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.