Saturday, April 27, 2024

/

छताचे पत्रे फोडून दुकानात चोरी

 belgaum

शहरातील विश्वेश्वरय्यानगर महाराष्ट्र बँकेनजीक असलेल्या एका भाजीपाला वजा किराणी मालाच्या दुकानाच्या छताचे पत्रे फोडून चोरट्यांनी सुमारे 20 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार विश्वेश्वरय्यानगर महाराष्ट्र बँकेनजीक दीपक बाबुराव लांडे यांच्या मालकीचे अन्नपूर्णा व्हेजिटेबल्स हे भाजीपाला वजा किराणा मालाचे दुकान आहे सदर दुकानाच्या छताचे पत्रे फोडून चोरट्यांनी काल रात्री दुकानातील तेलाची पाकिटे, बिस्किटे आदी सुमारे 20 हजार रुपयांचे साहित्य लंपास केले.Theft sadashivnagar

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सदर घटना घडली असून याआधी 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी असलेले एक पानपट्टी दुकान, मेडिकल शाॅप, एक स्नॅक्सचे दुकान अशी तीन दुकाने चोरट्यांनी फोडली होती.

 belgaum

त्याचप्रमाणे दीपक लांडे यांचे दुकान दुसऱ्यांदा फोडण्यात आले असून याआधी वर्षभरापूर्वी चोरट्यांनी ते पहिल्यांदा फोडले होते. या पद्धतीने सातत्याने या ठिकाणी चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.