बेळगाव जिल्ह्यामध्ये आज शनिवारी नव्याने 10 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 102 झाली आहे.
जिल्ह्यात आज आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले असून 4 जणांना कोरोना मुक्त झाल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये आज कोरोना मृत्यूची नोंद झाली नसल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 946 इतका अस्थिर आहे. दरम्यान राज्यभरात आज शनिवारी 1033 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
आजतागायत गेल्या 19 मे 2021 रोजी एकाच दिवशी सर्वाधिक 2234 रुग्ण आढळून आले होते. त्याचप्रमाणे 1 जून 2021 रोजी एकाच दिवशी सर्वाधिक 4270 रुग्णांना उपचारांती बरे झाल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.