स्पाइस जेट या विमान प्रवास देणाऱ्या कंपनीने आपल्या बेळगाव ते दिल्ली या प्रवासासाठी मॅक्स एट हे सर्वात मोठे एअरक्राफ्ट वापरले. गुरुवारी या एअरक्राफ्ट ने बेळगाव विमानतळाच्या धावपट्टीवर उतरून विमानतळाच्या इतिहासात एक वेगळेच संदर्भ जमा केले आहेत.
या निमित्ताने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळ संचालक राजेश कुमार मौर्य यांनी या विमानाचे स्वागत केले.
189 आसन क्षमता असलेल्या विमानाचे स्वागत करण्यात आल्यानंतर राजेश कुमार मौर्य यांनी आभार मानले. इतके मोठे विमान बेळगाव विमानतळावर उतरू शकते असा विश्वास दाखवल्याबद्दल आपण स्पाइस जेट चे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीने 13 ऑगस्ट पासून बेळगाव ते दिल्ली विमान सेवा सुरू केली असून प्रवाशांची संख्या वाढत आहे. गुरुवारी 77 प्रवासी दिल्लीहून बेळगाव ला आले आणि 76 पुन्हा दिल्लीला गेले आहेत. सुरवातीला आठवड्यातून एकदा आणि आता आठवड्यातून चार वेळा अशा पद्धतीने डिसेंबर 20 पासून ही विमानसेवा सुरू असून सोमवार, मंगळवार ,गुरुवार आणि शनिवारी बेळगाव दिल्ली प्रवासाची संधी उपलब्ध होत आहे.
सकाळी 6.35 ला दिल्ली तून निघून 9.30 वाजता विमान बेळगावला दाखल होते. तर सकाळी दहा वाजता निघून साडेबारा वाजता दिल्लीत पोहोचते. अर्थात अडीच तासात देशाच्या राजधानीत पोचण्याची सोय उपलब्ध झाली असून या सोयीत भलेमोठे विमान दाखल होऊन एक वेगळाच इतिहास घडला आहे.